गणेशोत्सवासाठी गावी जायला एसटीच्या 2225 जादा बसेस , 9 ऑगस्टपासून आरक्षण सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जुलै 2018

यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई प्रदेश क्षेत्रातील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने 2225 बसेसची सोय केली आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव आणि कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. या वर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून 2225 बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्यात.

 येत्या ९ ऑगस्ट पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live