कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणूक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 जून 2018

कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी जवळपास 70 हजार इतकी मतदार नोंदणी झाली आहे.

चौरंगी लढाई होत असली तरी थेट लढत ही शिवसेना विरूद्ध भाजप अशीच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप पुरस्कृत पुरोगामी आघाडी तसंच मनसे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यावेळी रिंगणात आहे.

तर, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठीही आज निवडणूक पार पडतेय. या निवडणूकीसाठीही सर्वांनीच आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या निवडणुकीसाठी सुमारे दोन हजाराहून अधिक पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

या निवडणूकीत भाजपकडून निरजंन डावखरे, शिवसेनेकडून संजय मोरे तर राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला निवडणूक लढवत आहेत.

सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live