मोदी हवाई दलाचे पैसे अनिल अंबानींना देतायत - राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 मार्च 2019

कोरापूट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशभक्तीच्या चर्चा सगळीकडे केली जात आहे. मात्र, ते हवाई दलाकडून पैसे घेऊन त्यांचे मित्र अनिल अंबानी यांना देत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आज (शुक्रवार) निशाणा साधला.

ओडिशातील कोरापूट येथे आयोजित जाहीरसभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हल्ला केला. त्याठिकाणी बॉम्ब टाकले. या कारवाईत आपल्या देशातील जवानही हुतात्मा झाले.

तसेच गेल्या 70 वर्षांपासून हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही कंपनी हवाई दलासाठी विमानांची निर्मिती करत आहे. मात्र, पंतप्रधान मोदी हे हवाई दलाकडून पैसे घेऊन त्यांचे मित्र अनिल अंबानी यांना देत आहेत. याशिवाय मोदींकडून देशभक्तीच्या चर्चाही केल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. 

Web Title: PM Modi gives money of Air Force to Ambani says Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Saam TV Live