कोरेगाव भीमा हिंसाचाराची तयारी आठ महिन्यांपूर्वी करण्यात आली - परमबीर सिंग

कोरेगाव भीमा हिंसाचाराची तयारी आठ महिन्यांपूर्वी करण्यात आली - परमबीर सिंग

Mumbai :  मुंबईत महाराष्ट्र पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन देशभरात मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा कट असल्याचं उघड केलंय. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. देशात अराजकता माजवण्याचा नक्षल्यांचा कट होता, त्याचबरोबर नक्षल्यांचा सरकारविरोधी युद्ध पुकारुन सरकार उलथवण्याचा डाव होता असा दावाही पोलिसांनी केलाय.

देशभरात 9 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत अनेक कागदपत्र त्याचबरोबर कम्प्यूटर्स, लॅपटॉप आणि त्यांचे पासवर्ड मिळवलेत. या सर्व कागदपत्रांच्या आधारे मोठा शस्त्रसाठा विकत घेणं, पंतप्रधान मोदींची हत्या आणि मोदी सरकार उलथवण्याचा कट असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. कथित नक्षल समर्थकांच्या घरी टाकण्यात आलेल्या धाडींचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंग यांनी यांनी दिली 

कोरेगाव भीमा हिंसाचार हा पुण्यापासून 40 किमी अंतरावर झाला होता. यामध्ये दोन विभागणी करण्यात आली होती, यामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग दाखविण्यात आला होता तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे यामध्ये दाखविण्यात आले होते.

दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार भडकाविण्याचा आरोप असलेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून पंधरा लाख रुपये देण्यात आल्याचा पुरावा असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांनी दिली. नक्षलवादाचा शहरी फ्रंट होता. त्यांच्या अनेक कॅडरची पॅरिसमध्येही बैठका झाल्याचे पुरावे पोलिसांकडे असल्याचे सिंग यांनी सांगितले.

WebTitle : marathi news koregaon bhima police press conference naxal connection 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com