कोरेगाव-भीमा दंगलीतील पीडित सुरेश सकट यांची मुलगी पूजा सकटचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

कोरेगाव-भीमा दंगलीतील पीडित सुरेश सकट यांची सोळा वर्षांची मुलगी पूजा सकट हिचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय. पुजा कालपासून बेपत्ता होती. तिचा मृतदहे वाडा इथल्या विहरीत आढळून आला. विशेष म्हणजे कोरेगाव-भीमा इथं झालेल्या दंगलप्रकरणात पूजा फिर्यादी होती. तिची हत्या झाल्याचा आरोप तिचे बंधू जयदीप सकट यांनी केलाय. पुजाच्या मृत्युची बातमी समजताच भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामगायकवाड, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे भारिपचे वसंतदादा साळवे आणि इतर कार्यकर्तेय ससून रूग्णालयात दाखल झाले.

कोरेगाव-भीमा दंगलीतील पीडित सुरेश सकट यांची सोळा वर्षांची मुलगी पूजा सकट हिचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय. पुजा कालपासून बेपत्ता होती. तिचा मृतदहे वाडा इथल्या विहरीत आढळून आला. विशेष म्हणजे कोरेगाव-भीमा इथं झालेल्या दंगलप्रकरणात पूजा फिर्यादी होती. तिची हत्या झाल्याचा आरोप तिचे बंधू जयदीप सकट यांनी केलाय. पुजाच्या मृत्युची बातमी समजताच भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामगायकवाड, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे भारिपचे वसंतदादा साळवे आणि इतर कार्यकर्तेय ससून रूग्णालयात दाखल झाले. दरम्यान याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  


संबंधित बातम्या

Saam TV Live