जून महिन्यात धरणात पाणीसाठा नसल्यास कोयनेची वीजनिर्मिती बंद पडणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मे 2019

कोयनानगर - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. या पार्श्‍वभूमीवर वीज ‘महानिर्मिती’ कंपनीने एक जूनपासून दोन हजार मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पासाठी कमी पाणी वापरण्याचा निर्णय घेतला, तसेच वीज निर्मितीसाठी तीन टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्यावर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता राजेश मोराळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात भरले. त्यामुळे धरणातून आतापर्यंत पूर्वेकडील सिंचन व पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी १०१.८८ टीएमसी पाणीसाठा देण्यात आला आहे; पण कोयना धरणातील पाणीसाठ्याने सध्या तळ गाठला आहे. धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठा आहे. 

जून महिन्यात धरणात पाणीसाठा नसल्यास कोयनेची वीजनिर्मिती आपोआप बंद पडणार आहे. त्यामुळे वीज कंपनीने पाणीकपात धोरण स्वीकारावे, असा प्रस्ताव कोयना प्रकल्पाने दिला होता. मुंबई येथे झालेल्या वीज कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्यात कोयना धरणातील तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवला जाईल.

Web Title: Koyana Dam Electricity Maharashtra Load Shading Disaster Rain

संबंधित बातम्या

Saam TV Live