क्रांतीदिनी होणाऱ्या मराठा मोर्चाची सरकारला धास्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : दोन वर्ष शांततेच्या मार्गाने आंदोलने करून हाती काहीही न लागल्याने संतप्त मराठा समाजाने आता आक्रमक होताच सरकारला दखल घ्यावी लागली. एकाही आंदोलनाला सामोरे न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून आंदोलन थांबविण्याचे प्रयत्नही झालेले आहेत. दरम्यान आता क्रांतीदिनी गुरुवारी (ता.९) मोर्चाची तयारी केली जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आंदोलकांशी आपला संवाद पोचविण्याचा कार्यक्रम सरकारने प्रशासनाच्या हाती दिला आहे. 

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी ९ ऑगस्ट २०१६ रोजी पहिला क्रांती मोर्चा येथून निघाल्यानंतर त्याचे राज्य, देशभर अनुकरण केले गेले. दोन वर्ष सरकारकडून काही निर्णय येईल, याची वाट पाहून थकलेल्या समाजबांधवानी गेल्या २० दिवसांपासून राज्यभर आक्रमक आंदोलने सुरु केली आहेत. दुर्दैवाने यात काही तरुण आत्महत्याही करीत आहे. समाज अत्यंत संतप्त झाल्याचे उशीराने लक्षात आलेल्या सरकारसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आंदोलने थांबविण्याचे विविध मार्गी प्रयत्नही करून पाहीले. मात्र, काही केल्या आंदोलक ऐकत नसल्याने मागासवर्ग आयोगाला लवकरात लवकर मराठा समाजाबद्दलचा सर्व्हेक्षण अहवाल देण्याची विनंती केली आहे. 

आता क्रांती दिनी होऊ घातलेल्या क्रांती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. विभागीय आयुक्‍तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आंदोलकांशी आपला संवाद पोचचावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. आयुक्‍तांनी तातडीने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांचा संवाद आंदोलकांपर्यंत अर्जंट घेऊन जाण्यासंदर्भात पत्रच काढले आहे. 

काल सह्याद्री आणि इतर दूरचित्रवाहिनींवरून जनतेशी मुख्यमंत्र्यांनी साधलेला संवाद लिखित स्वरुपात आंदोलकांपर्यंत पोचविला जात आहे. या संवादामध्ये विविध मागण्या मान्यतेच्या अनुषंगाने शासनाची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यात दिलेले आश्वासन पूर्ततेसाठी शासन कटिबद्ध आहे. तरी आंदोलकांनी आंदोलने मागे घ्यावीत, अशी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी शासनाच्यावतीने सर्व मराठा मोर्चा समन्वयकांना, आंदोलकांना विनंती केली आहे.

Web Title: #MarathaKrantiMorcha on 9th August in Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live