येत्या नऊ ऑगस्टला सकल मराठा समाजाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 जुलै 2018

औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय लातूर येथे रविवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. 

पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी पंढरपूर परिसरात कोणतेही आंदोलन करू नये, तसेच राज्यभर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवावे, असाही निर्णय घेण्यात आला आहे

औरंगाबादेतून नऊ ऑगस्ट २०१६ मध्ये मराठा क्रांती मूक मोर्चास सुरवात झाली होती. या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून महाराष्ट्र बंदसाठी हा दिवस निवडण्यात आला आल्याचे समन्वयकांनी सांगितले. यादरम्यान औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात रविवारी दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनीभूमिका स्पष्ट केली. समन्वयक म्हणाले, ‘‘ज्या ठिकाणी वारकरी थांबले असतील, त्या परिसरात मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन करू नये.’’ 

सोलापूर, मुंबईत आंदोलन
सोलापूर, मंगळवेढा, बार्शी, माढा, इंदापूर भागांत एसटीवर दगडफेकीच्या घटना घडल्याने वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतदेखील विविध ठिकाणी  ठिय्या आंदोलन केले. नवी मुंबई व ठाण्यात दोन दिवसांपासून ठिय्या सुरू आहे. 

युवकांचे अर्धनग्न आंदोलन 
बीड - परळी येथून सुरू झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंबा म्हणून पाटोदा येथील तहसील कार्यालय परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच असून,  रविवारी युवकांनी अर्धनग्न आंदोलन केले.

राज्यभरात मराठा आंदोलनाची दिशा बदलली असून, याला सरकारच जबाबदार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या सरकारने न्यायालयात शपथपत्र दिले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. यापुढे चिघळणाऱ्या आंदोलनाला सरकारच जबाबदार राहील. 
- नारायण राणे, खासदार

WEB TITLE : marathi news krantidin maratha kranti morcha sakal maratha maharashtra bandh

संबंधित बातम्या

Saam TV Live