'इन्स्टा पोल' च्या नकारात्मक मतांमुळे १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मे 2019

क्वालालंपूर : मलेशियातील एका 16 वर्षांच्या मुलीने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर "जगावे की मरावे' असा प्रश्न एका पोलच्या माध्यमातून विचारला होता. या पोल वर 69 टक्के जणांनी नकारात्मक मत नोंदविल्यानंतर संबंधित मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. मलेशियातील पूर्वेकडील सरावाक प्रांतात घडलेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश आज देण्यात आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या मुलीने इन्स्टाग्रामवर "जगावे की मरावे, यातील एकाची निवड करण्यासाठी मला मदत करा,' असे आवाहन एका पोलच्या माध्यमातून केले होते. त्यावर संबंधित मुलीला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्या 69 टक्के फॉलोअर्सनी नकारात्मक मत नोंदविले होते. 13 मे रोजी ही घडली. 

पोलवर नकारात्मक मत नोंदविणाऱ्यांवर युवतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी मलेशियातील संसदेचे सदस्य व वकील रामप्रकाश सिंह यांनी केली आहे. याप्रकरणी इन्स्टाग्रामची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

Web Title: A Person Died due to Insta Poll

संबंधित बातम्या

Saam TV Live