आवश्यक पुरावे सादर करा.. नाहीतर 'सिम' होईल डिस्कनेक्ट!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

देशभरातील जवळपास 50 कोटी मोबाईल यूजर्सना KYC संबंधित समस्येला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. ज्यामुळे त्यांचे मोबाइल सिम डिस्कनेक्ट होण्याची शक्यता आहे. कारण आता खासगी कंपन्या मोबाईल क्रमांकासाठी नव्याने पडताळणी करणार आहेत.

सिम कार्ड पडताळणीसाठी खासगी कंपन्या आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानुसार, खासगी कंपन्या आता मोबाईल क्रमांक पडताळणीसाठी आधार मागू शकत नाहीत. त्यामुळे जर ग्राहकाने आवश्यक पुरावे सादर केले नाहीत तर त्यांचं सिम कार्ड डिस्कनेक्ट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कोट्यवधी सिमकार्डधारकांना त्याचा फटका बसू शकतो. 

WebTitle : marathi news KYC aadhar documents for buying SIM 

संबंधित बातम्या

Saam TV Live