जमिन खोदकाम करताना मजुराला सापडला 42.59 कॅरेटचा मौल्यवान हिरा..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

भोपाळ (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशमधील एका मजुराला खाणीत काम करत असताना हिरा सापडला आहे. या हिऱ्यामुळे तो मजूर क्षणात मालामाल झाला आहे. मध्य प्रदेशमधील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यामध्ये एका मजुराचं नशीब फळफळले आहे. जमिनीत खोदकाम करत असताना मजुराला 42.59 कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला आहे.

हिरा सापडलेल्या मजुराचं मोतीलाल प्रजापती असे नाव आहे. खाणीत सापडलेला हिरा हा सगळ्यात जास्त वजनाचा दुसऱ्या क्रमांकाचा हिरा आहे. याआधी 1961 मध्ये येथे 44.55 कॅरेटचा सर्वात मोठा आणि मौल्यवान हिरा सापडला होता. कृष्णा-कल्याणपूर गावाजवळील एका खाणीत मोतीलाल आणि त्याच्या चार सहकाऱ्यांनी खोदण्याचं काम सुरु केले होते. त्यादरम्यान, त्यांना हा मौल्यवान हिरा सापडला. तो हिरा मोतीलाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हिरा कार्यालयात जमा केला आहे. 

मोतीलालला सापडलेल्या हिऱ्याचा जानेवारी महिन्यात लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तेथिल अधिकाऱ्यांनी दिली आहे. यातून मिळणाऱ्या रक्कमेतून सरकार कर कापून घेईल आणि उरलेली रक्कम मोतीलालला देण्यात येणार असल्याची माहितीदेखिली तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. लिलावानंतर मिळणारे सर्व पैसे सहकाऱ्यांमध्ये वाटून घेतले जातील असेही मोतीलाल यांनी सांगितले आहे.

Web Title: a labour finds diamond in mines of panna district madhya pradesh

संबंधित बातम्या

Saam TV Live