सोनं खाणारी बाई; महिलेचं पोट की तिजोरी ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जुलै 2019

सोनं म्हणजे महिलांचा विक पॉईंट, दागिन्यांसाठी अनेक बायका आपल्या नवऱ्याकडे हट्ट करतात. पण, पश्चिम बंगालमधल्या बीरभूमध्ये एक अजब प्रकार घडलाय. इथली एक महिला चक्क सोनं खाते, होय हे अगदी खरंय. रुनी खातू नावाची महिला पोटात दुखत असल्यानं सरकारी रूग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांनी तिच्या पोटावर शस्त्रक्रिया केली तेव्हा त्यांचेही डोळे विस्फरले.

शस्त्रक्रियेवेळी तिच्या पोटातून सोनं निघत होतं. केवळ नाणीच नाहीतर तर सोन्याच्या चेन, अंगठ्या, पैंजण, बांगड्या असा बरासचा ऐवज या महिलेच्या पोटातून निघाला.

रामपूरहाट सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील सर्जरी विभागाचे प्रमुख सिद्धार्थ विश्वास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेवर शस्त्रक्रिया केली. तिच्या पोटातून 90 नाणी, 69 चेन, 80 इअर रिंग, 11 नाकातल्या रिंग, 8 लॉकेट, 4 चाव्या, 2 चांदीची नाणी, पाच पैंजण, असा ऐवज काढण्यात आलाय. 

विशेष म्हणजे एव्हढं सारं सोनं खाऊनही ही महिला जिवंत आहे. ही महिला मानसिक रूग्ण असल्याचं सांगण्यात येतंय. ती राहत असलेल्या घरातील सोनं, नाणं गायब होत असल्यानं घरातले चिंतेत होते. या महिलेकडे चौकशी केल्यानंतर ती रडायची. मात्र शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या हाती सोन्याची तिजोरीच लागली. 

WebTitle : marathi news lady who has habit of eating gold after surgery doctor removed huge amount of gold

संबंधित बातम्या

Saam TV Live