पैठणीच्या शोधात लंडनच्या 'मॅडम'नी गाठलं येवला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 मार्च 2018

लंडनमधील महिलांना भारतीय पैठणी साडीनं भुरळ घातलीये. लंडनच्या म्यूझियममध्ये पाहिलेल्या पैठणीच्या शोधात असलेल्या महिलांनी चक्क येवला गाठलंय. येवल्याची पैठणी कधीच सातासमुद्रापार गेली आहे. लंडन येथील उद्योजिका स्टेफी वॅगनर आणि कॅमलिन जेन्सन यांनी लंडनमधील एका म्युझियममध्ये ब्रिटिशकालीन असलेल्या येथील देखण्या अस्सल पैठण्या पाहिल्या.

या म्युझियममध्ये असलेल्या राजमाता जिजाऊंसह अनेक दिग्गज महिलांनी परिधान केलेल्या एक से बढकर एक देखण्या पैठण्यांची या दोघांना चांगलीच भुरळ पडली. या मराठमोळ्या पैठण्यांची माहिती आणि फोटो मिळवले. एवढंच नाही तर इतके देखणे वस्त्र कोठे मिळेल याच्या शोधात लंडनहुन पैठणीचं गाव गाठलं.

संबंधित बातम्या

Saam TV Live