खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ कोसळली दरड

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 जुलै 2019

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज (रविवार) पहाटे खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या दुर्घटनेत सुदैवाने या दुर्घटनेत कसलेही नुकसान झालेले नाही. शनिवारपासून लोणावळा व खंडाळा घाट परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. रात्री पावसाच्या सोबत वारादेखिल असल्याने खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ डोंगराचा काही भाग सरकून द्रुतगती मार्गावर आला. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक मंदावली होती. 

या घटनेची माहिती समजताच खोपोली बोरघाट पोलिस व आयआरबीची मदत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळावर दाखल झाले असून मार्गावरील दरड बाजुला करण्याचे काम सुरु करण्यात आले.
 
Web Title: landslide on Mumbai-Pune Express highway khandala ghat

संबंधित बातम्या

Saam TV Live