कोरोना लसीची 30 हजार लोकांवर सर्वात मोठी मानवी चाचणी, अमेरिकेच्या मॉडर्नाची यशाकडे वाटचाल ? 

साम टीव्ही
मंगळवार, 28 जुलै 2020
  • कोरोना लसीची सर्वात मोठी मानवी चाचणी 
  • तब्बल 30 हजार लोकांवर लसीची चाचणी
  • अमेरिकेच्या मॉडर्नाची यशाकडे वाटचाल ? 

कोरोनावरच्या लसीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. त्यात अमेरिका आणि ब्रिटननं आघाडी घेतलीय. अमेरिकेच्या मॉडर्ना लसीची चाचणी आता अंतिम टप्प्यात आलीय. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल 30 हजार लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. 

आता तो दिवस फार दूर नसेल जेव्हा कोरनावरील लस प्रत्यक्षात तयार होईल. अमेरिका, ब्रिटन, रशियासह अनेक देश कोरोनावर लस तयार करण्यात गुंतले आहेत. अशातच एक मोठी बातमी आलीय. ती म्हणजे अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीकडून तब्बल 30 हजार लोकांवर लसीची चाचणी सुरू झालीय. ही लस देण्यात आल्यानंतर ती कितपत प्रभावी ठरते याचा अभ्यास मॉडर्नानं सुरू केलाय. 
 

असं केलं जाणार लसीचं परीक्षण 
लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना खरी लस देण्यात आलीय की, डमी लस याविषयीची माहिती देण्यात आलेली नाही. लसीचे दोन डोस दिल्यानंतर कोणत्या गटावर इन्फेक्शन होतंय हे पाहिलं जाईल. ज्या भागात कोरोनाचं सर्वाधिक संक्रमण आहे तिथल्याच स्वयंसेवकांना हे डोस देण्यात आले आहेत. मॉडर्नानं पहिली चाचणी 45 स्वयंसेवकांवर केली होती. तेव्हा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचं दिसून आलं. मात्र यातील काही जणांमध्ये किरकोळ ताप, अंगदुखी अशी लक्षणंही आढळून आली. 

कोरोनावर मात करण्यासाठी अमेरिका प्रत्येक लसीच्या चाचणीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्यात 30 हजार स्वयंसेवकांवर लसीच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यात ती लस किती परिणामकारक ठरते, तिचे दुष्परिणाम याचा अभ्यास संशोधकांमार्फत केला जाईल. मॉडर्नाच्या लसीनंतर पुढच्या महिन्यात ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी घेतली जाईल. सप्टेंबर महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सन आणि ऑक्टोबर महिन्यात नोवावॅक्स...या सर्व लसींचे परिणाम पाहून कोणती लस प्रभावी ठरते याचे निष्कर्ष काढले जातील. त्यानंतर अमेरिकेची आरोग्य यंत्रणा उपयुक्त अशी कोरोना लस जगासमोर आणेल असा अंदाज व्यक्त होतोय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live