पर्रीकरांनी केलेलं शेवटचं ट्विट..

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 मार्च 2019

नवी दिल्ली - शेवटच्या क्षणापार्यंत आपले कर्तव्य चोख बजावणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यांनी त्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरुन पाच दिवसांपूर्वी ट्विट केले होते. योगायोग म्हणजे त्यांनी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांना आपल्या ट्विटच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली होती. 

12 मार्च रोजी पर्रीकरांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी बांदोडकरांना त्याच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच गोव्याच्या प्रगतीमध्ये बांदोडकरांचा सिंहाचा वाटा असल्याचे पर्रीकरांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पर्रीकरांच्या निधनानंतर त्यांचे हे ट्विट व्हायरल झाले आहे.

दयानंद बाळकृष्ण बांदोडकर हे भाऊसाहेब बांदोडकर मह्णू ओखळले जायचे. ते महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे (MGP) नेते होते. तसेच गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी शशिकला काकोदकर गोव्याच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या.

संबंधित बातम्या

Saam TV Live