लातूरच्या मांजरा नदीपात्रात आढळली साडे आठ फुटी मगर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 मार्च 2018

लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीपात्रात मगर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. देवणी तालुक्यातील बटनपुरात सकाळी नदी किनाऱ्यावरील खड्ड्यात मोठी मगर असल्याची माहिती प्राणिमित्रांना मिळाली होती. त्यानंतर या प्राणिमित्रांनी तब्बल 5 तास अथक प्रयत्न करुन, अजस्त्र मगरीला खड्ड्याबाहेर काढलं. ही मगर तब्बल 8 फूट लांबीची असून, तिचं वजन जवळपास दीडशे किलोपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील नदीपात्राची पाण्याची पातळी खालावल्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये मगरींचा वावर वाढला आहे. या मगरीने शेतकऱ्यांचे अनेक पशुधनही मारले होते.

लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीपात्रात मगर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. देवणी तालुक्यातील बटनपुरात सकाळी नदी किनाऱ्यावरील खड्ड्यात मोठी मगर असल्याची माहिती प्राणिमित्रांना मिळाली होती. त्यानंतर या प्राणिमित्रांनी तब्बल 5 तास अथक प्रयत्न करुन, अजस्त्र मगरीला खड्ड्याबाहेर काढलं. ही मगर तब्बल 8 फूट लांबीची असून, तिचं वजन जवळपास दीडशे किलोपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील नदीपात्राची पाण्याची पातळी खालावल्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये मगरींचा वावर वाढला आहे. या मगरीने शेतकऱ्यांचे अनेक पशुधनही मारले होते. ही मगर पकडली गेल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून, प्राणिमित्रांनी ही मगर वनविभागाच्या ताब्यात दिली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live