नवमतदारांनी आपली मत देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना समर्पित करावे : नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 एप्रिल 2019

औसा (लातूर): देशातील नवमतदारांनी आपली मत देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना समर्पित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) आपल्या भाषणात केले. मोदींनी नवमतदारांना आवाहन करताना हुतात्मा झालेल्या जवानांचा उल्लेख केला आहे.

औसा (लातूर): देशातील नवमतदारांनी आपली मत देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना समर्पित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) आपल्या भाषणात केले. मोदींनी नवमतदारांना आवाहन करताना हुतात्मा झालेल्या जवानांचा उल्लेख केला आहे.

मोदी म्हणाले, 'देशातील निवडणुकांमध्ये जे मतदार यंदा सर्वप्रथम मतदान करत आहेत. हे तेच मतदार आहेत, जे 21 व्या शतकात मतदान करणार आहेत. 21 व्या शतकात देशाचे सरकार निवडणारे हे मतदार आहेत. त्यामुळे 21 व्या शतकात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी मी काही गोष्टी सांगू इच्छितो की, आपण नेहमी पाहतो किंवा आपली ती संस्कृती आहे, की आपण आपली पहिली कमाई आपल्या आईजवळ ठेवतो. तसेच आपली पहिली कमाई देवापुढे किंवा आपल्या बहिणीकडे सुपूर्द करतो. त्यामुळे जीवनातील आपले पहिले ऐतिहासिक मत आपण पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करणाऱ्या जवानांना समर्पित करणार का ? तुमचे पहिले मतदान पुलवामामध्ये जे वीर हुतात्मा झाले, त्या हुतात्मा जवानांना तुमचे पहिलं मतदान समर्पित होईल का ? गरिबाला पक्के घर मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे यासाठी तुमचे मत समर्पित होईल का ? असे म्हणत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी मते मागितली आहेत.'

औसा येथे उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व लातूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. जवानाच्या बलिदानाचे राजकारण होता कामा नये, सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचे राजकारण होता कामा नये असे नेहमीच बोलते जाते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून देशातील लष्कराचा वापर हा राजकीय मुद्दा बनवून केला जात आहे. विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांच्या या मुद्द्याचे राजकारण होत असल्याचे सांगत जुने दाखले दिले जात आहेत.

दरम्यान, यंदा 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचे सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या मतदारांना आवाहन करत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमधील जवानांच्या नावाने मतदान मागितले आहे.

Web Title: Firstly dedicate your vote to heroic soldiers; Modis appeal to newly elected voters of loksabha 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live