शेतकरी आत्महत्या झाल्यास  सरकारी मदत मिळते या लालसेपोटी मुलानेच केली जन्मदात्या पित्याच्या हत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

शेतकरी आत्महत्या झाल्यास राज्य सरकार मदत करते या मदतीच्या लालसेपोटी मुलानेच जन्मदात्या पित्याच्या डोक्यात दगड घालून खुन केला आणि नंतर प्रेत विहीरीत फेकल्याची घटना उघडकीस आलीय. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारची मदत मिळते. ती मदत मिळवण्यासाठी बापाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

या घटनेने किल्लारी परिसरात खळबळ उडाली आहे. औसा तालुक्यातील किल्लारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संक्राळ येथील 39 वर्षीय बालाजी नामदेव माळी याने 14 सप्टेंबरला दूपारी चार वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेले आपले वडिल नामदेव माळी यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला.

रात्री पत्नीच्या मदतीने त्यांचा मृतदेह गावाशेजारील विहीरीत टाकला. घरातील रक्त शेणाने सारवून टाकले आणि माझ्या बापाने कर्जास कंटाळून आत्महत्या केली आहे असा बनाव रचला. शवविच्छेदनात डोक्यात गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालं. पोलिसांनी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला हिसका दाखवताच आपणच पत्नीच्या मदतीने खून केल्याची कबुली त्याने दिली. बालाजी माळी याच्यावर किल्लारी पोलिसात काल गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live