मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 जून 2019

लातूर - मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर जिल्ह्यात शनिवारी (ता.22) काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्‍त केला आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहेत. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पाऊस, विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे, शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची कामे करू नयेत, दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विजेच्या खांबाजवळ बांधू नयेत, जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, पूरप्रवण क्षेत्रात जाऊ नये, पावसात विजेच्या तारा कोसळण्याची शक्‍यता असते, त्यापासून सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Marathwada Heavy Rain Weather Environment


संबंधित बातम्या

Saam TV Live