महिन्यातून दोनदा होतो पाणीपुरवठा; लातूरमध्ये भीषण पाणीटंचाई

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

भर पावसाळ्यात पाण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा.. पाणी आलं की बायकांची उडणारी झुंबड.. कोणी पाणी देतं का पाणी अशी अवस्था झालीय लातूरची.. हे चित्र कित्येक वर्षांपासून असंच आहे.. भर पावसाळ्यातही लातूरमध्ये एक एक थेंब पाण्यासाठी लोकं भटकतायत.. प्रशासनाच्या हातापाया पडतायत. ४ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या लातूरमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालीय. पावसानं ओढ दिल्यानं लातूरवर पुन्हा जलसंकट ओढावलंय. पाऊस आला तरंच लातूरकरांची तहान भागणाराय. आणि पाऊस पडण्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीयत. 

मांजरा धरणातली पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागलीय. महिन्यातून दोनदा पाणीपुरवठा तर ऑगस्टपर्यंत पुरेल इतकंच पाणी मांजरा धरणात शिल्लक आहे.

लातूरमधले सर्वच मध्यम प्रकल्प, लघू पाटबंधारे प्रकल्प, गाव तलाव, साठवण तलाव, बॅरेजेस कोरडे ठणठणीत आहेत. पाण्याच्या दुर्भिक्षासाठी ठोस उपाययोजना होणार तरी कधी याच्या प्रतिक्षेत लातुरकर आहेत.

WebTitle : marathi news lature water scarcity is at peak citizens of latur gets water only twice in a month 

संबंधित बातम्या

Saam TV Live