"लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्‍य आता मुंबईतील नाक्‍यानाक्‍यावर ऐकायला मिळणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 एप्रिल 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सध्या धुमाकूळ घालत असलेले "लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्‍य आता मुंबईतील नाक्‍यानाक्‍यावर ऐकायला मिळणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचे गाजलेले व्हिडीओ डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून गल्लीबोळात पोहोचवणार आहेत. या मोहिमेची सुरुवात माहीम कोळीवाड्यापासून होईल. 

मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसतानाही राज ठाकरे यांनी ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफा डागल्या आहेत. या जाहीर सभांमध्ये ते केवळ आरोप न करता भाजपने केलेल्या जाहिराती आणि वस्तुस्थिती असे व्हिडीओ दाखवत आहेत. या चित्रफिती दाखवण्यापूर्वी त्यांचे "लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्‍य राज्याच्या राजकारणात गाजत आहे. 

राज ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवरही "हिट' झाले आहेत. "लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्‍य अनेकांच्या मुखात जाऊन बसले आहे. हे व्हिडीओ आता मुंबईतील नाक्‍यानाक्‍यावर दाखवले जाणार आहेत. त्यासाठी मनसेच्या डिजिटल व्हॅन माहीम कोळीवाड्यापासून अनेक ठिकाणी उभ्या केल्या जात आहेत. माहीम, दादर परिसरात तीन डिजिटल व्हॅन आहेत. मोदीमुक्त देशासाठी इतर भागांतही याच पद्धतीने प्रचार करण्यात येईल, असे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. 

घराघरात प्रचार 
मनसे रस्त्यांवर डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून भाजपविरोधात प्रचार करणार आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्ते घराघरात जाऊन राज ठाकरे यांचे विचारही मतदारांपर्यंत पोहोचवणार आहेत. संपूर्ण शहरात या पद्धतीने धडाका लावला जाईल, असे यशवंत किल्लेदार म्हणाले.

Web Title: MNS Digital van

संबंधित बातम्या

Saam TV Live