महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी; लक्ष्मण माने यांचा नवीन पक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

पुणे : वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले लक्ष्मण माने यांनी बुधवारी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी नावाचा नवीन पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. राज्यातील डाव्या आघाडीच्या पक्षासह आपला पक्ष काम करणार असल्याचे त्यांनी कॅम्पमधील आरोरा टॉवरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

जनता दल (सेक्युलर) चे महासचिव निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यावेळी उपस्थित होते. जागा वाटपबाबत काँगेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा करण्यात येणार आहे. 

शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, CPI,  CPM, संभाजी ब्रिगेड आपल्या बरोबर आहे. येत्या 29 जुलैला दुपारी 2 वाजता बालगंधर्व रंग मंदिरात पक्षाचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.

WebTitle : marathi news laxman mane formed new political party with the name of maharashtra bahujan wanchit aaghadi

संबंधित बातम्या

Saam TV Live