वडापावमध्ये आढळली चक्क मेलेली पाल 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

वडापावमध्ये चक्क मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आलाय.

या प्रकारानंतर वडापाव विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केलीये. अंबरनाथ पूर्व भागातल्या स्टेशन परिसरातील बबन वडापाव दुकानात हा धक्कादायक प्रकार समोर आलंय.

या भागातील एका कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीने  ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी वडापाव नेले. मात्र वडापाव खाताना त्यात मेलेली पाल आढळून आली.

दरम्यान अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाची तपासणी केली असता  बबन वडापाव या दुकानाचं फूड लायसन्स सुद्धा संपल्याचं समोर आलं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live