लिंगायत समाजातील काँग्रेस आणि जेडीएसचे 18 आमदार करणार क्रॉस वोटिंग ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 मे 2018

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विश्वासमत ठरावावेळी लिंगायत समाजातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 18 आमदारांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विरोधी पक्षांचे लिंगायत समाजातील हे आमदार राजकीय भविष्य आणि समाजाचा रोष पत्करावा लागू नये, यासाठी 'क्रॉस व्होटिंग' करू शकतात, असं भाजपच्या अनेक नेत्यांना वाटतं. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पांनी आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. विरोधी पक्षांतील लिंगायत समाजातील आमदारांनी आपल्याला मत द्यावं, हा त्यामागचा उद्देश होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विश्वासमत ठरावावेळी लिंगायत समाजातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 18 आमदारांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विरोधी पक्षांचे लिंगायत समाजातील हे आमदार राजकीय भविष्य आणि समाजाचा रोष पत्करावा लागू नये, यासाठी 'क्रॉस व्होटिंग' करू शकतात, असं भाजपच्या अनेक नेत्यांना वाटतं. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पांनी आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. विरोधी पक्षांतील लिंगायत समाजातील आमदारांनी आपल्याला मत द्यावं, हा त्यामागचा उद्देश होता. येडियुरप्पांचा पराभव झाल्यास समाजाच्या नाराजीमुळं आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व मते भाजपच्या झोळीत पडतील, असं कर्नाटकच्या उत्तरेतील अनेक काँग्रेस आमदारांना वाटतंय, असंही भाजपच्या नेत्याचं म्हणणं आहे. त्यामुळं आता लिंगायत समाजातील आमदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live