...तर तुमचे पॅन कार्ड रद्द होणार !

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 मार्च 2020

केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार क्रमांकाशी जोडणी करण्याची मुदत गेल्यावेळेस वाढविली होती. यामध्ये सलग आठव्यांदा मुदत वाढ देण्यात आली होती. मात्र यंदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याने असल्याचे बोलले जात आहे. 

नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार क्रमांकाशी जोडण्याची चालू महिन्यात अखेरची संधी आहे. चालू महिन्यात 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड आधारची जोडणी न केल्यास ग्राहकांचे पॅनकार्ड रद्द होणार असून ग्राहकाला 10 हजारांचा दंड भरावा लागेल.

केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार क्रमांकाशी जोडणी करण्याची मुदत गेल्यावेळेस वाढविली होती. यामध्ये सलग आठव्यांदा मुदत वाढ देण्यात आली होती. मात्र यंदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याने असल्याचे बोलले जात आहे. 

आधार आता प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड मिळण्यासाठी बंधनकारक असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  पॅन-आधार जोडणीसाठी केंद्र सरकारने 31 मार्च 2020 पर्यंत मुदत वाढवली आहे. यापूर्वी 31 डिसेंबर 2019 रोजी अंतिम मुदत होती.प्राप्तिकर कायदा 1961 मधील तरतूद 139AA नुसार,पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे.  त्यामुळे वेळेत जोडणी न केल्यास येत्या 1 एप्रिलपासून पॅनकार्ड रद्द  होईल, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने  (सीबीडीटी ) ट्विटरद्वारे दिली आहे.

Web Title: marathi news link pan card to adhaar card or else it will be canceled !

संबंधित बातम्या

Saam TV Live