व्हिस्की, बीअर परवडत नाही; मुंबईकर वळाले देशी दारूकडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 एप्रिल 2018

मुंबईकर चक्क देशी दारूकडे वळले असल्याचं समोर आलंय. व्हिस्की, बीअर परवड नसल्यानं मुंबईकरांनी चक्क देशी दारुला पसंती दिलीये. मद्यावरील विविध करांमुळे बीअर, व्हिस्कीच्या दरात मोठ्य़ा प्रमाणावर वाढ झाली. बारमध्ये बसणेही अवाक्याबाहेर गेल्याने तळीरामांनी आता देशी दारूची वाट धरली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत बीअर पिणाऱ्यांचे प्रमाण २.६ टक्क्यांनी घटले असून त्याउलट देशी पिणाऱ्यांचे प्रमाण ४.९ टक्क्यांनी वाढले आहे.

मुंबईकर चक्क देशी दारूकडे वळले असल्याचं समोर आलंय. व्हिस्की, बीअर परवड नसल्यानं मुंबईकरांनी चक्क देशी दारुला पसंती दिलीये. मद्यावरील विविध करांमुळे बीअर, व्हिस्कीच्या दरात मोठ्य़ा प्रमाणावर वाढ झाली. बारमध्ये बसणेही अवाक्याबाहेर गेल्याने तळीरामांनी आता देशी दारूची वाट धरली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत बीअर पिणाऱ्यांचे प्रमाण २.६ टक्क्यांनी घटले असून त्याउलट देशी पिणाऱ्यांचे प्रमाण ४.९ टक्क्यांनी वाढले आहे. राज्यात विदेशी दारू पिणाऱ्यांची संख्या ६.८ टक्क्यांनी तर बीअर पिणाऱ्यांची संख्या १५ टक्क्यांनी, वाईन ३.३ टक्क्यांनी तर देशी दारूचे प्रमाण ४ टक्क्यांनी घटले आहे. मुंबईत मात्र तळीरामांची संख्या वाढली आहे. विदेशी पिणाऱ्यांची १.३ टक्क्यांनी, वाईनची ५.५ टक्क्यांनी तर देशी दारू पिणाऱ्यांची संख्या ४.९ टक्क्यांनी वाढली आहे. बीअर पिणाऱ्यांचे प्रमाण मात्र २.६ टक्के घटले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live