श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या धार्मिक कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

पुणे : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा भाद्रपद गणेशोत्सव सोहळा भाद्रपद शुध्द चतुर्थी (गणेश चतुर्थी) गुरुवार (ता. 13) ते भाद्रपद शुध्द चतुर्दशी (अनंत चतुर्दशी) रविवार (ता. 23) पर्यंत साजरा होणार आहे. 

यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्रींच्या उत्सव मंडपामध्ये श्रींच्या उत्सव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा, महिला अथर्वशीर्ष पठण, गणेशयाग, सहस्त्रपुष्पअर्चना, भाविकांच्या हातून अभिषेक महापूजा व दाक्षिणात्य पद्धतीने विविध प्रकारचे अभिषेक असे धार्मिक विधी होणार आहेत.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे - 
- गुरुवार (ता. 13) सप्टेंबर (गणेश चतुर्थी) : श्रींची आगमन मिरवणूक - श्री दगडूशेठ गणपती मंदिरापासून - सकाळी 8:30 वाजता. 

- श्रींच्या उत्सवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना परमपूज्य गाणपत्य श्री धुंडीराजशास्त्री पाठक यांच्या हस्ते : सकाळी 11:05 मिनिटांनी 

- श्रींच्या उत्सवानिमित्त केलेल्या "तामिळनाडू मधील तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराच्या" विद्युत रोषणाईचा उद्घाटन सोहळा - सायंकाळी ७ वाजता

- माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांचा श्री गणेश जागर : रात्री 10 वाजता

- शुक्रवार (ता. 14) :  ऋषीपंचमी निमित्त हजारो माता - भगिनींचे अथर्वशीर्षपठण : पहाटे 6 वाजता 

- गणेशयाग - शुक्रवार (ता. 14) ते मंगळवार (ता. 18) : सकाळी 9 ते 12 व दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत

- भाविकांच्या हातून करण्यासाठीचे अभिषेक व महापूजा - 14 सप्टेंबर पासून ते 22 सप्टेंबर 2018 -  सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.

- शनिवार (ता. 15) :सकाळी 6:15 विद्यार्थी सूर्यनमस्कार               
 
Web Title: list of 10 days religious programs of dagadusheth halwai ganpati

संबंधित बातम्या

Saam TV Live