जगातील 30 सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 22 शहरे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मार्च 2019

नवी दिल्ली (पीटीआय) : जगातील सर्वांत प्रदूषित वीस शहरांमध्ये भारतातील 15 शहरे आहेत. त्यातही गुरगाव, गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि भिवडी ही शहरे पहिल्या सहांमध्ये आहेत. सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांमधील 18 शहरे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील असल्याचे "आयक्‍यू एअर व्हिज्युअल 2018'च्या अहवालात म्हटले असून, "ग्रीनपीस'च्या मदतीने तो तयार करण्यात आला आहे. 

भारतातील सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये गुरगाव आणि गाझियाबाद असून, त्यापाठोपाठ फरिदाबाद, भिवडी आणि नोएडाचे क्रमांक आहेत. गेल्या वर्षी सर्वाधिक प्रदूषित शहर असलेली राजधानी नवी दिल्ली यंदा 11 व्या क्रमांकावर आहे. चीनची राजधानी बीजिंग अद्यापही प्रदषित असल्याचे हा अहवाल सांगतो. जगातील 30 सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 22 शहरे आहेत. 

जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरे 

 1. गुरगाव (भारत) 
 2. गाझियाबाद (भारत) 
 3. फैसलाबाद (पाकिस्तान) 
 4. फरिदाबाद (भारत) 
 5. भिवडी (भारत) 
 6. नोएडा (भारत) 
 7. पाटणा (भारत) 
 8. होतान (चीन) 
 9. लखनौ (भारत) 
 10. लाहोर (पाकिस्तान) 
 11. दिल्ली (भारत) 
 12. जोधपूर (भारत) 
 13. मुझफ्फरपूर (भारत) 
 14. वाराणसी (भारत) 
 15. मुरादाबाद (भारत) 
 16. आग्रा (भारत) 
 17. ढाका (बांगलादेश) 
 18. गया (भारत) 
 19. काश्‍गर (चीन) 
 20. जिंद (भारत) 
 21. कानपूर (भारत) 
 22. सिंगरौली (भारत) 
 23. कोलकता (भारत) 
 24. पाली (भारत) 
 25. रोहतक (भारत) 
 26. मण्डी गोविन्दगड (भारत) 
 27. शिंगताई शी (चीन) 
 28. शिझ्झुआंग (चीन) 
 29. अहमदाबाद (भारत) 
 30. अक्‍सू (चीन) 

हवेतील अतिसूक्ष्म कणांचे (पीपीएम 2.5) 2018 मधील सर्वसाधारण प्रमाण (प्रतिघनमीटर मायक्रोग्रॅम) 

Web Title : marathi news list of worlds most polluted cities 

संबंधित बातम्या

Saam TV Live