LOC पासून 300 मीटरवर पाक सैन्याच्या तीन हेलिकॉप्टरच्या घिरट्या.. प्रत्युत्तरादाखल भारतीय सेनेचा गोळीबार.

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

एरव्ही एलओसीवर अंदाधूंद फायरिंग करुन वांरवार शस्त्रसंधींच उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने, पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. सर्व नियम धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या तीन एमआय-17 हेलिकॉप्टर्सनी थेट एलओसीवरच घुसखोरी केली. एलओसीपासून 300 मीटर अंतरापर्यंत हे तिन्ही हेलिकॉप्टर येऊन परतले. ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर भारतीय लष्कराकडून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यात आला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांनुसार, सीमेपासून जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत कोणत्याही देशाचं हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी नाही.

एरव्ही एलओसीवर अंदाधूंद फायरिंग करुन वांरवार शस्त्रसंधींच उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने, पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. सर्व नियम धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या तीन एमआय-17 हेलिकॉप्टर्सनी थेट एलओसीवरच घुसखोरी केली. एलओसीपासून 300 मीटर अंतरापर्यंत हे तिन्ही हेलिकॉप्टर येऊन परतले. ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर भारतीय लष्कराकडून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यात आला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांनुसार, सीमेपासून जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत कोणत्याही देशाचं हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी नाही. तसेच लढाऊ विमानांना हे अंतर 10 किलोमीटर पर्यंतच आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live