उलट्या लोकल प्रवासामुळे प्रवाशांच्या डोक्याला ताप; मुंबईत रेल्वेचा आंधळा कारभार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

मुंबईच्या लोकलमध्ये विंडो सिट मिळणं याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काहीच नसतं. मुंबईकर विंडो सिटसाठी धडपडत असतो. सिट मिळवण्याच्या भानगडीत अनेक मुंबईकर उलटा प्रवास करतात.

मुंबईतल्या अंबरनाथ, ठाणे, विरार स्टेशनवरील प्रवाशांना याचा मोठा त्रास होतो. सीएसएमटीला जाण्यासाठी उल्हासनगर विठ्ठलवाडीहून बसून अंबरनाथला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. उलटा प्रवास करणाऱ्यांमुळे अंबरनाथच्या प्रवाशांना बसायला मिळत नाही. त्यामुळं प्रवाशांवर आंदोलन करण्याची वेळ आली.

पुरेशा लोकल नसल्यानं नाईलाजास्तव उलटा प्रवास करावा लागतो असं अनेक प्रवासी सांगतात. 
रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळं प्रवाशांना  जनावरासारखा कोंबून प्रवास करावा लागतोय. उलट्या प्रवासाच्या सर्कशीला प्रवाशांपेक्षा रेल्वेच जबाबदार आहे असं खेदानं म्हणावं लागतंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live