मुंबईच्या लोकलमध्ये लेडी स्टंटगर्ल तरूणीची लोकलच्यादारात सुरु असलेली स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 सप्टेंबर 2018

आतापर्यंत तुम्ही मुंबईच्या लोकलचे स्टंटबाज पाहिले असतील. धावत्या लोकलला लोंबकळून धोकादायक स्टंट करणारे हे स्टंटबाजांमुळे रेल्वे पोलिसांच्या डोक्याला ताप झालाय. आता हे कमी की काय तरूणींनाही स्टंट करण्याचा मोह आवरता येत नसल्याचं दिसून आलंय.

हार्बर रेल्वेच्या एका लोकलमध्ये स्टंट करताना एक तरूणी कॅमेऱ्यात कैद झालीय. एका प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार ही तरूणी सीएसएमटी- वाशी लोकलमध्ये रे रोडला चढली. त्यानंतर तिनं दरवाज्यात उभं राहून रेल्वेच्या खांबाला हात लावण्यासाठी लोकलमधून बाहेर वाकू लागली. लोकल वेगात असताना तिचा ही स्टंटबाजी सुरू होती. कॉटन ग्रीन स्टेशन येताच तिनं लोकलमधून उडी टाकली.

चित्रित झालेला व्हिडिओ रात्री साडेअकराच्या सुमाराचा आहे. रात्री लेडिज फर्स्ट क्लासमध्ये ही स्टंटबाजी सुरू असताना पोलिस किंवा होमगार्ड कुठं होते असा सवालही आता विचारला जातोय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live