हातात काचेची बाटली आणि विक्षिप्त हालचाली; कल्याण लोकलमध्ये  महिलांच्या डब्यात घुसला तरुण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 ऑगस्ट 2018

कल्याण ट्रेनमध्ये एक गर्दुल्ल्ला शनिवारी संध्याकाळच्या सुमारास महिलांच्या डब्यात शिरला. त्याच्या  हातात काचेची बाटली होती. तो विक्षिप्त हालचालीही करताना या व्हिडिओत दिसतोय. 

यावेळी डब्यातील महिलांनी चेन खेचली मात्र धक्कादायक बाब म्हणजे चेन खेचूनही गाडी थांबली नाही. कळवा स्थानकात हा गर्दुल्ल्ला उतरला. मात्र स्थानकावर उपस्थित एकाही RPF पोलिसाला या गर्दुल्ल्याचं महिला डब्यातून उतरणे नजरेस पडले नाही.

साम टीव्हीच्या एका महिला प्रेक्षकानं धाडस दाखवून हा व्हिडीओ काढला आणि आम्हाला पाठवला. या व्हिडीओमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि रेल्वे पोलिसांच्या गलथान कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live