महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत मुंबईची दिल्ली होतेय का ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

लोकल ट्रेनमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यादेखत एका महिलेला जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. अपंगाच्या डब्यात महिलेला गुराढोरासारखी मारहाण करणारा हा इसम त्याच महिलेचा नवरा असल्याचं समजतंय. पैशांच्या वादातून मद्यधुंद आरोपी पती रफिक चिनकन अली खानने महिलेचे केस ओढूऩ, गळा आवळण्याचाही प्रयत्न केला. मारहाणीचा हा सर्व प्रकार दिव्यांगाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. दिव्यांगांच्या डब्याशेजारीच महिलांचा डबा होता. यामध्ये फक्त एक पत्रा होता.

लोकल ट्रेनमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यादेखत एका महिलेला जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. अपंगाच्या डब्यात महिलेला गुराढोरासारखी मारहाण करणारा हा इसम त्याच महिलेचा नवरा असल्याचं समजतंय. पैशांच्या वादातून मद्यधुंद आरोपी पती रफिक चिनकन अली खानने महिलेचे केस ओढूऩ, गळा आवळण्याचाही प्रयत्न केला. मारहाणीचा हा सर्व प्रकार दिव्यांगाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. दिव्यांगांच्या डब्याशेजारीच महिलांचा डबा होता. यामध्ये फक्त एक पत्रा होता. दरम्यान, महिलांच्या डब्यातील एक पोलीस कर्मचारी हा संपूर्ण धक्कादायक प्रकार फक्त पाहत असल्याचंही समोर आलंय. पोलीसाने फक्त मारहाण करणाऱ्य़ा व्यक्तीला आरडाओरडी केली, मात्र साखळी खेचून गाडी थांबवण्याची तत्परताही दाखवली नाही. घडलेल्या सर्व प्रकाराने महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत मुंबईची दिल्ली होतेय का असा प्रश्न उपस्थित होतोय  
 


संबंधित बातम्या

Saam TV Live