महाराष्ट्रातील 5 कारागृहात लॉकडाऊन

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह आणि कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात येत आहेत.

राज्यातील 5 कारागृह  लॉकडाऊन केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह आणि कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात येत आहेत.

या संबंधित कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था आतच करण्यात करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी. असंही सांगण्यात आले आहे.

Web Title- marathi news Lockdown at 5 prisons in Maharashtra


संबंधित बातम्या

Saam TV Live