राज्यातील या ठिकाणी कुणामुळे आली पुन्हा लॉकडाऊनची वेळ?

साम टीव्ही
गुरुवार, 2 जुलै 2020
 • ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये लॉकडाऊन
 • राज्यात महिन्याभरात तब्बल 1 लाख रुग्ण वाढले
 • का आली पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ?

कोरोनाचं संकट गेली अनेक महिने सहन केल्यानंतर आता कुठं अनलॉकची प्रक्रीया सुरु झाली. अर्थकारणाला गती मिळू लागली. पण मुंबईजवळच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. पण हा लॉकडाऊन कुणामुळं जाहीर झालाय.

देशभरातच्या लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रीया सुरु झाली. हळूहळू उद्योगांसह दुकानंही सुरु झाली. अर्थकारणाला गती देण्यासाठी ठाकरे सरकारनं अनेक सवलतीही दिली. जनजीवन सुरळीत होईल असं भाकीत वर्तवलं जात होतं. पण, अवघ्या काहीच दिवसांच्या अनलॉकमध्ये रुग्णवाढ शेकडो पटीनं वाढली. आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची मागणी पुढं आली.

रुग्णवाढीच्या या आकड्यांवरुन सगळं लक्षात येईल...

 • ठाणे जिल्ह्यात 27 मेला 20 टक्के कोरोना वाढीचा वेग होता. तोच 28 जूनला 31 टक्के झाला
 • पालघरमध्ये 27 मेला 16 टक्क्यानं रुग्णवाढ होत होती, ती 28 जूनला 29 टक्क्यांवर पोहचली
 • रायगडमध्ये 15 टक्के असणारा दर, 24 टक्क्यांवर पोहचला...
 • तर औरंगाबादमध्ये रुग्णवाढीचा दर 12 टक्क्यांवर 22 टक्क्यांपर्यंत पोहचला.
 • राज्यातील एकूण कोरोनावाढीचा दर जो मे महिन्यात 15 टक्क्यांवर होता, तो आता 19 टक्क्यांवर पोहचलाय.

जिथं आधी कोरोनाचा प्रभाव नव्हता. तिथंही कोरोनानं आता एन्ट्री केलीय. कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि पनवेलजवळच्या गावांमध्येही कोरोनाचे रुग्ण आता दररोज सापडताहेत. रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरती करण्यासाठी बेड्स नाहीत. त्यामुळं रुग्णांचे हाल होताहेत. हेच पाहता कल्याण डोंबिवली आणि ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये आजपासून लॉकडाऊन लावण्यात आलाय. तर पनवेल मनपानंही १३ जुलैपर्यंत लॉकडाऊनही घोषणा केलीय. पण तुम्ही जर काही सवई बदलल्या तर पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही.

तुमच्या या सवयी बदला, कोरोनाला हरवा!

 • छोट्या-मोठ्या खरेदीसाठी वारंवार बाहेर पडणं टाळा
 • बाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करा
 • बाहेरुन आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवा
 • शक्य असल्यास होम डिलीव्हरीचा पर्याय निवडा
 • कुटुंबातील एकानेच बाहेरुन खरेदीची जबाबदारी घ्या
 • कामावर जाताना मास्क, सॅनिटायझर सोबत ठेवा
 • मजा म्हणून बाहेर फिरायला जाणं काहीकाळ थांबवा
 • लॉकडाऊन नको असेल. पुन्हा सुरळीत आयुष्य हवं असेल. तर प्रत्येकानं थोडी बंधनं पाळणं गरजेचंय. लॉक़डाऊन असो वा नसो, आता आयुष्य बदललंय. त्यानुसार प्रत्येकानं वागणं शिकायला हवं. बाजारात गर्दी करणं, तोंडाला मास्क न लावणं, हात अस्वच्छ ठेवणं ही सवय बदलायला हवी. तरच आपण कोरोनाला मिळवून हरवू शकू.


संबंधित बातम्या

Saam TV Live