LOCKDOWN | वाचा लॉकडाऊन संदर्भातील महत्वाची मोठी बातमी

साम टीव्ही
मंगळवार, 7 एप्रिल 2020

14 एप्रिलनंतर लॉकडाऊन राज्याच्या काही भागात काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होऊ शकतं.

14 एप्रिलनंतर लॉकडाऊन राज्याच्या काही भागात काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होऊ शकतो. जिथं कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा भागातील लॉकडाऊन शिथिल करावा, असं मत असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय, यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असंही त्यांनी म्हटलंय, राज्याच्या मंत्रीमहोदयांनीच लॉकडाऊन शिथिल करावा असं मत व्यक्त केल्यानं चर्चांना उधाण आलंय. तर १४ एप्रिलनंतर राज्यातील लॉकडाऊन काही संपण्याची शक्यता नाही. देशातील लॉकडाऊन शिथील होणार असलं. तरी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता. पंधरा एप्रिलपासून लॉकडाउन संपूर्णपणे शिथिल होईल, असं कुणीही गृहित धरू नये. असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलंय. दहा आणि पंधरा एप्रिलच्या दरम्यान जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा बारकाईनं अभ्यास करून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत निर्णय घेतील असंही स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, राज्यात होणारी करोना विषाणूची बाधा हा चिंतेचा विषय नाही तर त्याचा मृत्यूचा दर वाढतो आहे, ही काळजीची बाब असल्याचं त्यांनी सांगितलंय.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 891 वर पोहचलीय... आज सकाळी 23 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडलीय. मुंबईत 10, पुण्यात 4 रुग्णांची भर पडलीय... अहमदनगरमध्ये 3, नागपूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी 2 नवे रुग्ण आढळलेत. तर ठाणे आणि सांगलीत प्रत्येकी 1 रुग्ण वाढलाय..

 दरम्यान देशातही तीच स्थिती आहे. देशभरात कोरोनाचे 4 हजार 421 रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून दिल्ली आणि तामिनाडूमधील रुग्णांची संख्या 600 च्या वर गेलीय, तर केरळ, उत्तर प्रदेश आणि तेलंगणात 300 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. सध्या देशभरातल्या विविध रुग्णालयांमध्ये 3 हजार 981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मृतांचा आकडा 114 वर पोचला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. देशात आतापर्यंत 326 जणांवर यशस्वी उपचार झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तरीही, लॉकडाऊन शिथिल होऊ शकतो. जिथं कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा भागातील लॉकडाऊन शिथिल करावा, असं मत असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय, यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील,


संबंधित बातम्या

Saam TV Live