वाचा, महाराष्ट्रात आजपासून कुठे कसा असेल लॉकडाऊन?

साम टीव्ही
मंगळवार, 14 जुलै 2020

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात लॉकडाऊनची कडक कारवाई सुरू झालीय. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिस कारवाई करताना दिसतायत. चौकाचौकात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलीय. दुचाकीस्वार, चालत फिरणाऱ्यांनाही पोलिस अडवत आहेत.

पुण्यात आजपासून कडक लॉकडाऊन सुरू झालाय. मात्र पुणेकर नेहमीप्रमाणे घराबाहेर पडल्याचं चित्र आहे. पुण्यातल्या महत्त्वाच्या अशा संचेती चौकात मोठी वाहतूक कोंडी झालीय. पोलिस वाहनांची तपासणी करत आहेत. विना परवाना रस्त्यावर आलेल्यांना नोटीस देऊन कारवाई करण्यात येतेय. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होताना दिसतेय.

या पार्श्वभूमीवर विनाकारण बाहेर भटकणाऱ्यांवर कारवाई केली जाणारे. पुणे पोलिसांनी तसा इशाराही दिलाय. त्यामुळे लोकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर दुसरीकडे इकडे रायगड आणि ठाण्यातही लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. रायगडमध्ये आज मध्यरात्रीपासून  24 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणारे. तर ठाण्यातही 8 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. 19 जुलैपर्यंत ठाण्यात आता हा लॉकडाऊन असणारे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात लॉकडाऊनची कडक कारवाई सुरू झालीय. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिस कारवाई करताना दिसतायत. चौकाचौकात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलीय. दुचाकीस्वार, चालत फिरणाऱ्यांनाही पोलिस अडवत आहेत. त्यांना घराबाहेर पडण्याचं कारण विचारतायत. योग्य कारण नसल्यास बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येतेय.

पुणे शहरात आजपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झालाय. सर्व दुकाने, रस्ते बंद आहेत. त्याचा परिणाम हातावर पोट असणाऱ्या लोकांवर झालाय.
बेघर लोक रस्त्यावर आलेत. या लोकांवर उपासमारीची वेळ आलीय. आमची व्यवस्था करा, आम्ही जगायचं कसं असे सवाल हे लोक विचारतायत. त्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर हतबल झालेल्या आणि रस्त्यावर उतरलेल्या या लोकांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये उद्यापासून २८ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय पालिकेनं घेतलाय.  नागरिकांनीही कडकडीत लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्र्यंबकेश्वरमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण नऊ प्रतिबंधित क्षेत्र असून १४ वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आलीत.  त्र्यंबकेश्वराचं मंदिर मागील 3 महिन्यांपासून बंद असल्यानं बाहेरील भाविक तसंच पर्यटक शहरात येत नसले, तरी बाहेरील विक्रेते आणि शहरात ये-जा कामगारांची संख्या मोठी आहे. दरम्यान पुढील आठवड्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार असल्यानं, श्रावणात तरी त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडणार का? याकडे भाविकांचं लक्ष लागलंय.

रायगडमध्ये आज मध्यरात्रपीपासून कडक लॉकडाऊन लागणार आहे. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरेंनी हा निर्णय घेतलाय. सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे आज मध्यरात्रूपासून लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊन दरम्यान, फक्त मेडिकल्सच सुरु राहणार आहेत. किराणा मालाची दुकानं तसंच भाजी विक्रीही बंद राहणार आहेत. .त्यामुळे पुढचे काही दिवस रायगडमधील लोकांना अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यताय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन घोषणा करताना यावेळी अतिशय कडक निर्बंध लावण्यात आले आहे. 24 जुलैपर्यंत रायगडमध्ये लॉकडाऊन असणारे. राजयड जिल्यातील पनवेल शहरास ग्रामीण भागातही रुग्णवाढीची चिंता सतावते आहे. तसंच अलिबाग, उरण, पेण, खालापूरमध्ये रुग्ण वाढण्याचं प्रमाण वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी लॉक़डाऊन लावण्यात येतोय. लातूर जिल्ह्यात 14 जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होणारंय. 15 जुलै ते 30 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असेल. सुरूवातीचे 5 दिवस कडक बंद असेल. 20 जुलैनंतर काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल. तर बारामती नगरपरिषद हद्दीत गुरुवारपासून लॉकडाऊन असेल.15 जुलैला मध्यरात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरूवात होईल. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार राहणार बंद असतील अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live