'तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलं, तो फक्त ट्रेलर होता.. पिक्‍चर अभी बाकी है- NITIN GADKARI

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

लोकसभा 2019 : भंडारा : 'तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलं, तो फक्त ट्रेलर होता.. पिक्‍चर अभी बाकी है..' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) विरोधकांना इशाराच दिला. विदर्भामध्ये गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन झाले. 

नागपूर-भंडारा हा सहा पदरी रस्ता तयार केला जाणार आहे आणि एक हजार कोटी रुपयांचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू होईल, अशी घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. गडकरी म्हणाले, "सर्वाधिक आत्महत्या झालेल्या जिल्ह्यात एकूण 108 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यासाठीच्या एकूण निधीपैकी 25 टक्के रक्कम केंद्र सरकार आणि 75 टक्के रक्कम नाबार्ड देणार आहे. यासाठी एकूण 20 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.'' 

'भाजपमध्ये कुठलीही घराणेशाही नाही' असे सांगत गडकरी यांनी कॉंग्रेसला टोला लगावला. 'आमदार किंवा खासदाराने मागितले, म्हणून त्यांच्या मुलांना तिकीट मिळणार नाही. कार्यकर्त्यांकडून, जनतेकडून ही मागणी झाली पाहिजे', असे गडकरी म्हणाले. 

'सत्तेत आल्यापासून आम्ही जनतेसाठी कामे केली आहेत. विदर्भाचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा चेहराच बदलण्याचे काम आम्ही केले आहे. याचे श्रेय भाजपला नाही, जनतेला आहे. आतापर्यंत तुम्ही जे पाहिले, तो फक्त ट्रेलर होता.. पिक्‍चर अभी बाकी है', असा सूचक इशाराही त्यांनी दिला. 

Web Title: Nitin Gadkari says this is just a trailer of Modi Government

संबंधित बातम्या

Saam TV Live