आंबोलीमध्ये गावकर्यांनी टाकला लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 एप्रिल 2019

आंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्‍न न सुटल्याने येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या संबंधीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. 

शशिकांत गावडे, श्रीकांत गावडे यांनी ग्रामस्थांच्यावतीने दिलेल्या निवेदनातील आशय असा - आंबोलीत जमिनी कबुलायतदार गावकर या नावाने होत्या. यावर शेती करून ग्रामस्थ कुटुंब चालवायचे. 1999 मध्ये राज्याने एका आदेशाव्दारे या जमिनी महाराष्ट्र शासनाच्या नावे केल्या. याबाबत स्थानिकांना विश्‍वासात घेतले नाही. गेली 20 वर्षे सर्व सरकारने मुळ ग्रामस्थांना जमिनी देण्याची आश्‍वासने दिली; मात्र ती पाळली नाहीत. उलट यातील जमिनीवर खाजगी वने, राखीव वने अशा बंदी घातल्या. कोणत्याच पक्षाला, नेत्यांना या प्रश्‍नाचे गांभीर्य नाही. यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. पण आश्‍वासनापलीकडे काहीच हाती आले नाही. यामुळे मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आमचा हा बहिष्कार कायम राहील, असेही यात नमुद आहे. हे निवेदन सावंतवाडी तहसीलदारांकडे देण्यात आले. 

Web Title: Loksabha 2019 Amboli villagers boycott election
 
संबंधित बातम्या

Saam TV Live