कोल्हापुरात भारी ठरतोय आमचं ठरलंय फॅक्टर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

कोल्हापूर - एकाद्या निवडणूकीत एखादा प्रश्‍न एखादा महत्त्वाचा मुद्दा प्रचारात महत्त्वाचा ठरतो पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आमचं ठरलंय हा शब्द खुप महत्त्वाचा ठरला आहे असे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांना निवडणूक आणण्याचा शब्द कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खरा करून दाखवल्याचे चित्र आहे.  

सतेज पाटील यांनी या निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आणि शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे या निवडणूकीत सतेज पाटील यांच्या भोवतीच मोठे राजकारण केंद्रीत झालेले पाहायला मिळत आहे. 

प्रा. संजय मंडलिक हे पाचव्या फेरीत सध्या ६० हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. महाडिक यांना त्यांची सोयीची भूमिका यावेळी नडली असल्याचेच चित्र आहे. 

दरम्यान नि़वडणूक निकालात मंडलिक यांची आघाडी दिसून आल्याने त्यांच्या घरासमोर गर्दी वाढताना दिसत आहे. पोलिस बंदोबस्तही त्यांच्या घरासमोर वाढवण्यात आला आहे. 

Web Title: Loksabha 2019 Election result Kolhapur constituency

संबंधित बातम्या

Saam TV Live