साध्वी प्रज्ञासिंहला खोट्या केसमध्ये अडकविले : अमित शहा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 एप्रिल 2019

कोलकता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या केसमध्ये अडकविले असल्याचे सांगितले. प्रज्ञासिंहांच्या विरोधात त्यांना हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोट्या केसमध्ये अडकविण्यात आले होते. यातून देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले. तर न्यायालयात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे, असे शहा यांनी कोलकता येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

जहां तक साध्वी प्रज्ञा का सवाल है तो कहना चाहूंगा कि हिंदू टेरर के नाम से एक फर्जी केस बनाना गया था, दुनिया में देश की संस्कृति को बदनाम किया गया, कोर्ट में केस चला तो इसे फर्जी पाया गया: श्री @AmitShah #BharatBoleNaMoNaMo

— BJP (@BJP4India) April 22, 2019

स्वामी असिमानंद आणि इतर हिंदूत्ववादी लोकांवर खोटे खटले दाखल करून त्यांना आरोपी बनविण्यात आले. तर समझौता एक्सप्रेसमध्ये स्फोट करणाऱ्यांना का सोडून देण्यात आले असा सवालही त्यांनी केला. 

सवाल ये है कि स्वामी असीमानंद जी और बाकी लोगों को आरोपी बनाकर फर्जी केस बनाया तो, समझौता एक्सप्रेस में ब्लास्ट करने वाले लोग कहां है, जो लोग पहले पकड़े गए थे, उन्हें क्यों छोड़ा: श्री @AmitShah #BharatBoleNaMoNaMo pic.twitter.com/n034bjKtG1

— BJP (@BJP4India) April 22, 2019

पश्चिम बंगालमध्ये या वेळी परिवर्तन होणार. पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी यांना स्पष्टपणे पराभव दिसत आहे. त्यांना याची जाणीव झाली असल्यामुळे ममता आता विरोधकांवर व निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. भाजप नेत्यांच्या सभेला परवानगी न देणाऱ्या ममतांनाच आता बंगालच्या जनतेने नाकारले आहे, असेही शहा यांनी यावेळी सांगितले. 

हमारी रैली को बंगाल में अनुमति न देने वाली ममता दीदी की रैलियों को आज जनता अनुमति नहीं दे रही। उनकी रैलियों में भीड़ नहीं उमड़ रही है: श्री @AmitShah#BharatBoleNaMoNaMo

— BJP (@BJP4India) April 22, 2019

संबंधित बातम्या

Saam TV Live