काँग्रेसनं टाकला नवा डाव; पंतप्रधानपदावरचा दावा सोडण्याचीही तयारी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मे 2019

लोकसभा निवडणुकीत निकाल लागण्यापूर्वीच भाजपप्रणित एनडीएला सत्तेपासून रोखण्यासाठी रणनिती आखण्यास विरोधी पक्षांनी सुरुवात केलीय. लोकसभा निवडणुकीत प्रचारात फारश्या सक्रिय नसलेल्या सोनिया गांधींनीच यासाठी पुढाकार घेतलाय.

23 तारखेला सोनिया गांधींनी यूपीएच्या घटकपक्षांची बैठक बोलावलीय. विशेष म्हणजे सोनिया गांधींनी 2009 मध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं नसतानाही भाजप विरोधकांची मोठ बांधून सत्तासोपान गाठला होता. आता त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी पंतप्रधानपद सोडण्याची तयारी काँग्रेसनं दाखवलीय.

स्वबळावर सत्ता येण्याचा दावा भाजप नेते करताहेत. मात्र विरोधकांनी सुरू केलेल्या या मोर्चेबांधणीवर मोदींनी टीकास्त्र सोडलंय. केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास प्रादेशिक पक्षांचे महत्व प्रचंड वाढणार आहे. प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षांना धुमारे फुटलेत. विरोधकांनी 21 तारखेला बैठक बोलावलीय. या बैठकीत कोण कोणते पक्ष उपस्थित राहताहेत याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.

एकूणच दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पुढील राजकीय समिकरणाबाबतच्या मोर्चेंबांधणीला सुरूवात झालीय

Link : marathi news loksabha election 2019 congress vs bjp strategies before results

संबंधित बातम्या

Saam TV Live