साताऱ्यात राजे की पाटील; आज होणार फैसला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही बाजूंकडून तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. हॅट्‌ट्रिक साधताना उदयनराजेंचे मताधिक्‍य कमी होणार की वाढणार, यासोबतच नरेंद्र पाटील परिवर्तन करून इतिहास घडविणार, या चर्चांना आज पूर्णविराम मिळणार आहे. लोकशाहीतील मतदारराजाने कोणाला दिल्लीत जाण्याची संधी दिली, याचा उलगडा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत यावेळेस सुरवातीपासूनच वेगळीच परिस्थिती होती. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही पक्षाचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला सुरवातीला पक्षातून विरोध झाला. पण, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांना सरळ करत तिसऱ्यांदा उदयनराजे भोसले यांनाच तिकीट दिले. तर दुसरीकडे भाजपचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सातारा लोकसभेसाठी तयारी सुरू केली. पण, सातारा मतदारसंघ युतीच्या वाटपात शिवसेनेकडे असल्याने तिकिटाची अडचण झाली. शेवटी नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत घेऊन त्यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे राजे विरुद्ध माथाडी नेते, अशी लढत झाली. या लढतीनंतर निकालाबाबत सुरवातीपासूनच दोन्ही पक्षांसह सामान्य जनतेतूनही अनेक तर्कवितर्क वर्तविले जाऊ लागले. 

कऱ्हाड, पाटणमध्ये नाराजी असल्याने उदयनराजेंचे मताधिक्‍य कमी होणार, सर्वसामान्य मतदार परिवर्तनासाठी नरेंद्र पाटील यांना साथ देणार, साताऱ्यात धक्कादायक व अनपेक्षित निकाल लागणार आदी चर्चांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते. सुरवातीला उदयनराजेंचे मताधिक्‍य दीड ते अडीच लाख असेल असे म्हणणारे राष्ट्रवादीचे नेते निकालाची तारीख जवळ येईल, तसेच २५ हजार, ५० हजार, एक लाख असे मताधिक्‍याचे आकडे कमी कमी सांगू लागले आहेत. पण, प्रत्यक्षात मतदार राजाने कोणाच्या पारड्यात किती मते टाकलीत, हे मतमोजणीतच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उद्या (गुरुवारी) होणाऱ्या मतमोजणीत सर्व दावे, तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळणार आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Result Udayanraje Bhosale Narendra Patil Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live