लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेनंही फुंकलं रणशिंग

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 जानेवारी 2019

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेनंही रणशिंग फुंकलंय. नरेंद्र मोदींनी सोलापुरातून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बीडमधून तर राहुल गांधींनी राजस्थानमधून प्रचाराचा नारळ फोडलाय.

सोलापुरात भाजपकडून विकासकामांचा शुभारंभ केला गेलाय, तब्बल 3 हजार कोटी रुपयांच्या योजनांचा आज सोलापुरात शुभारंभ केला गेलाय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी बीडमधून दुष्काळ दौऱ्याला सुरुवात केलीय.

तिकडे राजस्थानमध्ये राहुल गांधींनी जयपूरमध्ये प्रचारसभा घेतली. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं कर्जमाफी केली तशीच कर्जमाफी २०१९ मध्ये सत्तेत आल्यानंतर करणार अशी घोषणाच राहुल गांधींनी केलीय.

एकंदरीतच लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असताना प्रचाराचं बिगुल वाजलंय.
 
WebTitle : marathi news loksabha elections in 2019 shivsena starts political campaigning 

संबंधित बातम्या

Saam TV Live