मातोश्रीवर सेनेची तर जालन्यात भाजपची बैठक; तर शिवसेनेला लोकसभेच्या 2 जास्त जागा, सुत्रांची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 जानेवारी 2019

भाजपनं शिवसेनेला लोकसभेत 2 जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचा 24-24 जागांचा म्हणजेच 50 : 50 चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय.

आगामी निवणुकांमध्ये शिवसेना भाजपची युती होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याबाबतचा अंदाज बांधणंही सध्या कठीण आहे. मात्र, भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीआधी युतीच्या हालचालींना वेग आलाय. 

निवडणुक पूर्व तयारीसाठी शिवसेनेची बैठक 

'शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे सर्व नेते आणि खासदारांची आज महत्त्वाची बैठक होतेय.  बैठकीत लोकसभा मतदारसंघ निवडणुक पूर्व तयारी संदर्भात चर्चा होणार असल्याचं समजतंय. आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार असल्याचं समजतंय. बैठकीला शिवसेनेचे सर्वच वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांसह खासदार हजर राहणार आहेत.

जालन्यात भाजपाच्या कार्यकारणीची बैठक

जालन्यात भाजपाच्या कार्यकारणीची बैठक होतेय. या बैठकीला भाजपच्या सर्व मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती मिळतेय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात ही मोठी बैठक होतेय. युतीबाबत अजूनही चित्र स्पष्ट नसल्यानं या बैठकीत काय चर्चा होते, कोणते निर्णय घेतेले जातात याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.

WebTitle : marathi news loksabha elections shivsena bjp seat sharing both shivsena and bp conducts meetings 

संबंधित बातम्या

Saam TV Live