'पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्यामुळे समाजाला नवी ओळख मिळाली' : बी.जे खताळ पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मे 2019

लोणी :  पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्वभावातच समाजसेवा होती. त्याच्यामुळेच समाजाला नवी ओळख मिळाली. ज्ञानाला किंमत देणारा मोठा माणुस पद्मश्रींच्या व्यक्तिमत्वात पाहायला मिळाला. पद्मश्रींचे कार्य इतके मोठी होते की, अनेक वर्षे त्यांचे नाव सांगीतले जाईल असे गौरवोद्गार जेष्ठनेते माजीमंत्री बी.जे खताळ पाटील यांनी व्यक्त केले.

लोणी :  पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्वभावातच समाजसेवा होती. त्याच्यामुळेच समाजाला नवी ओळख मिळाली. ज्ञानाला किंमत देणारा मोठा माणुस पद्मश्रींच्या व्यक्तिमत्वात पाहायला मिळाला. पद्मश्रींचे कार्य इतके मोठी होते की, अनेक वर्षे त्यांचे नाव सांगीतले जाईल असे गौरवोद्गार जेष्ठनेते माजीमंत्री बी.जे खताळ पाटील यांनी व्यक्त केले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यातिथी निमित्त आयोजित संत तुकाराम महाराज गाथा पारायण सप्ताहाची सांगता उध्दरव महाराज मंडलिक यांच्या किर्तनाने झाली. यावेळी प्रवरा परिवाराच्या वतीने शंभर वर्षे पुर्ण झाल्याबद्दल बी. जे. खताळ पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, भाऊसाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे पाटील, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, कैलासराव तांबे, अध्यक्ष बाळासाहेब भवर, गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, राजेश परजणे, डॉ.भास्करराव खर्डे, शांतीनाथ आहेर उपस्थित होते.

खताळ म्हणाले की, प्रवरेनंतर जिल्ह्यात ज्यावेळी सहकारी साखर कारखानदारी सुरु करण्याची वेळ आली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता पद्मश्रीं विठ्ठलराव विखे पाटलांनी सर्वांना पाठबळ दिले. कोणताही गर्व नसलेला मोठेपणा त्यांच्यात पाहायला मिळाला. आज सहकारी साखर कारखानदारीला दिशा देणाऱ्यांनाच तुमचा काय संबध असा प्रश्ना केला जातो. पण लोणी हा संगमनेरचा एक काळ अविभाज्य घटक होता हे समजुन घ्यावे आणि नाही त्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये असा सुचक आणि मौलिक सल्लाही त्यांनी आपल्या भाषणातुन दिला.

अध्यक्षिय भाषणात म्हस्के म्हणाले की, खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी जिल्ह्यातील प्रस्थापितांविरोधात संघर्ष केला. विखे पाटील परिवाराला राज्यात आणि जिल्ह्यात अडचणीत आणण्याचे काम होत असले तरी, सत्ता म्हणुन प्रवरा परिवाराने कधी विचार केला नाही.

राधाकृष्ण विखे म्हणाले की, पद्मश्री आणि खासदार साहेबांनी अध्यात्माचा वारसा जोपासला. त्यामुळेच या भागाला विचारांची बैठक मिळाली व विकासाला दिशा लाभली. डॉ.सुजय विखे पाटील यांनी आभार मानले.या प्रसंगी माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचा गौरव कारण्यात आला. 
यावेळी उद्धव महाराज मंडलिक, शालिनीताई विखे पाटील, भाऊसाहेब विखे पाटील, आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील आदींची उपस्थिती होती . 

Web Title : Society got new recognition due to Padmashree Dr. Vitthalrao Vikhe Patil: B.J. Khatalk Patil


संबंधित बातम्या

Saam TV Live