अरबी समुद्रात उठणार कमी तीव्रतेचं वादळ... 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

अरबी समुद्रात तयार झालेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राचं रविवार सकाळपर्यंत कमी तीव्रतेच्या वादळात रूपांतर होण्याचे संकेत आहेत. या वादळाच्या प्रभावामुळे कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोकण किनारपट्टीलगत ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. उंच लाटा उसळून समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारपर्यंत कोकण, गोवा, कर्नाटकच्या किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

WebTitle : marathi news low intensity storm in Arabian sea konkan coastal region may observe medium  to high rainfall 

संबंधित बातम्या

Saam TV Live