तुमच्या गॅस सिलिंडरची होतेय चोरी; राजरोसपणे  सुरु आहे गॅसचा काळाबाजार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 जानेवारी 2019

भरलेला सिलेंडर आणि रिकामा सिलेंडर आडवे करून एकमेकां समोर ठेवले जातात. त्यानंतर दोन्ही सिलेंडरच्या तोंडाला एक ट्रान्स्फर डिव्हाईस लावलं जातं आणि नॉबच्या साहाय्यानं गॅस ट्रान्फर केला जातो. तर दुसऱ्या एका पद्धतीनुसार दोन सिलेंडर एकमेकांजवळ आणून एअर प्रेशरच्या साहाय्यानं गॅस ट्रान्सफर केला जातो..कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून केवळ एक ते दोन किलो गॅसचीच चोरी केली जाते. 

घरगुती गॅस सिलिंडर म्हणजे तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय. घरातला गॅस सिलिंडर संपला तर एकवेळचं जेवण मिळणंही कठीण. सिलिंडरचे दर वाढले की देशातलं राजकारणंही तापतं. पण याच सिलिंडरचा राजरोजसपणे काळा बाजार सुरूय. 

कल्याण क्राईम ब्रांचनं गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. डोंबिवली पुर्वेकडील भारत गॅसच्या गोडावूनध्ये ही चोरी चालायची. हे चोरटे एक लोखंडी नळी लावून घरगुती सिलिंडरमधून गॅस काढायचे आणि हाच गॅस कमर्शियल सिलेंडरमध्ये भरला जायचा. 

अवघ्या 10 सेकंदात 2 किलो गॅस चोरी केला जायचा आणि मग या कमर्शियल गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री केली जायची. पोलिसांना याचा सुगावा लागताच या टोळीच्या मुसक्या आवळल्यायत. तर गॅस एजन्सीचा सुपरवायझर फरार झालाय. 

अशी होते गॅसची चोरी 

भरलेला सिलेंडर आणि रिकामा सिलेंडर आडवे करून एकमेकां समोर ठेवले जातात. त्यानंतर दोन्ही सिलेंडरच्या तोंडाला एक ट्रान्स्फर डिव्हाईस लावलं जातं आणि नॉबच्या साहाय्यानं गॅस ट्रान्फर केला जातो. तर दुसऱ्या एका पद्धतीनुसार दोन सिलेंडर एकमेकांजवळ आणून एअर प्रेशरच्या साहाय्यानं गॅस ट्रान्सफर केला जातो..कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून केवळ एक ते दोन किलो गॅसचीच चोरी केली जाते. 

संबंधित बातम्या

Saam TV Live