पतीच्या मित्राने बेशुद्ध करून केला बलात्कार...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

लुधियाना: पतीच्या मित्राला मदतीसाठी बोलावून घेतले. मदतीसाठी तो आलाही. पण, त्याने एक पेय प्यायला दिले अन् शुद्धीवर आले तेंव्हा माझ्या अंगावर कपडे नव्हते. माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला होता, अशी तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे दिली.

लुधियाना: पतीच्या मित्राला मदतीसाठी बोलावून घेतले. मदतीसाठी तो आलाही. पण, त्याने एक पेय प्यायला दिले अन् शुद्धीवर आले तेंव्हा माझ्या अंगावर कपडे नव्हते. माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला होता, अशी तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे दिली.

लुधियानामध्ये शनिवारी (ता. 20) रात्री ही घटना घडली आहे. पीडित महिला लुधियाना कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आपल्या पतीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी तिने पतीच्या मित्राकडे रात्रीच्या निवाऱ्यापुरती मदत मागितली होती. यावेळी आरोपीने मदतीचा हात पुढे करताना आपल्या मित्रांसोबत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला पतीला भेटण्यासाठी लुधियाना कारागृहाबाहेर थांबली होती. पण पतीची भेट होऊ शकली नाही. उशिर झाल्यामुळे तिने एका लुधियानातच थांबण्याचा निर्णय घेतला. पतीचा मित्र विक्रमजीत सिंह याला फोन केला. एका प्रकरणात तो पतीसोबत सहआरोपी होता. विक्रमजीत याने पीडित महिलेलला राहण्याची व्यवस्था करतो म्हणून सांगितले.

विक्रमजीतने महिलेला घरी आणण्यासाठी आपला भाऊ भवन याला न्यायालयाजवळ पाठवले. भवन आपल्या मित्रांसोबत गेला. पण तिला विक्रमजीतच्या घरी नेण्याऐवजी दुसरीकडे घेऊन जात होता. महिलेला संशय आल्यामुळे तिने विक्रमजीतला पुन्हा फोन करुन त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपण नवीन घरात राहण्यासाठी आलो असून, आई आणि पत्नी घरात नसल्याचे सांगितलं. भवन याने पीडित महिलेला गुंगीचे औषध मिसळलेले पेय पिण्यास दिले. शुद्धीवर आल्यानंतर अंगावर कपडे नव्हते. महिलेने तत्काळ पोलिस चौकी गाठली.

दरम्यान, पीडित महिलने भवन आणि त्याच्या मित्रांवर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकऱणात विक्रमजीतचा काही संबंध आहे का, याबाबतही पोलिस पुढील चौकशी करत आहेत.

Web Title: woman gangraped by husband friends in ludhiana


संबंधित बातम्या

Saam TV Live